“उसने पैसे परत दिले नाही”, नराधमाने नवऱ्यासमोरच केला पत्नीवर अत्याचार, व्हिडिओ केला व्हायरल

दीड वर्षांनंतरही पैसे परत न केल्याच्या रागातून आरोपीने व्यापाऱ्याच्या पत्नीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना समोर आला आहे. एवढेच नव्हे तर फिर्यादीच्या पत्नीवर केलेल्या अत्याचार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Wed, 26 Jul 2023
  • 05:26 pm
Pune crime : “उसने पैसे परत दिले नाही”, नराधमाने नवऱ्यासमोरच केला पत्नीवर अत्याचार, व्हिडिओ केला व्हायरल

“उसने पैसे परत दिले नाही”, नराधमाने नवऱ्यासमोरच केला पत्नीवर अत्याचार, व्हिडिओ केला व्हायरल

हडपसर पोलीसांनी आरोपीला केले गजाआड

पुण्यातील बोपखेल परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यापाऱ्याने काही कालावधीसाठी आरोपीकडून उसने पैसे घेतले होते. मात्र, दीड वर्षांनंतरही पैसे परत न केल्याच्या रागातून आरोपीने व्यापाऱ्याच्या पत्नीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना समोर आला आहे. एवढेच नव्हे तर फिर्यादीच्या पत्नीवर केलेल्या अत्याचार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ३४ वर्षीय पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हडपसर पोलीसांनी अवघ्या १ तासाच्या आत आरोपीला अटक केली आहे. इम्तियाज हंशील शेख (वय ४७, रा. म्हाडा कॅालनी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इम्तियाज हा येरवडा परिसरातील रस्त्यावर बॅग विकतो. तर पीडित महिलेचा पती मसाल्याचे पाकीटे विकतो. तर पीडित महिला बोपखेत येथील राहणारी आहे. दोघांमध्ये ओळख झाल्यानंतर पीडित महिलेच्या पतीने आरोपी इम्तियाजकडून ४० हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, आरोपीकडून घेण्यात आलेले पैसे दीड वर्ष झाल्यानंतरही परत केले नाही. आरोपीने पैशांसाठी तगादा लावला होता. तगादा लावूनही हे पैसे परत करता आले नाहीत. त्यामुळे आरोपीने पीडितेला तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन हडपसर येथील म्हाडा कॉलनी येथे पतीसह बोलावून घेतले.

पीडिता आणि पती म्हाडा कॉलनी येथे पोहोचल्यावर आरोपीने पीडितेच्या पतीला चाकूचा धाक दाखवून पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्यासमोरच पीडितेवर जबरस्तीने शारीरिक संबंध प्रस्तापीत केले. आरोपी यांनी फिर्यादी यांच्या पत्नीवर केलेला अत्याचार देखील या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. एवढेच नाही तर पीडितेवर बलात्कार करताना त्याने या घटनेचा व्हिडिओ तयार केला. आरोपीने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला वारंवार ब्लॅकमेल केले. तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली आणि वेळोवेळी बलात्कार केला. सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने आरपीला नकार दिला. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ खरोखरच सोशल मीडियावर व्हायरल केला. अखेर पीडितेने हडपसर पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदीवली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest