पिंपरी-चिंचवड : घरात घुसून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

घरात घुसून ज्येष्ठ नागरिकाला हत्याराने मारहाण केल्याची घटना बुधवारी (१ मे) मध्यरात्री आळंदी येथे घडली. चौरंगनाथ तुकाराम निकन (वय ६२, रा. बडगाव रोड, आळंदी) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

आळंदी : घरात घुसून ज्येष्ठ नागरिकाला हत्याराने मारहाण केल्याची घटना बुधवारी (१ मे) मध्यरात्री आळंदी येथे घडली. चौरंगनाथ तुकाराम निकन (वय ६२, रा. बडगाव रोड, आळंदी) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pimpri Chinchwad Crime)

त्यानुसार, जयेश भरत गोळे (वय २३) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी हे आळंदी येथे वडगाव रोड येथे राहतात. बुधवारी मध्यरात्री आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी फिर्यादी यांनी प्रतिकार केला असता, त्याच्या हातातील हत्याराने फिर्यादींच्या डोळ्यावर वार केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest