पिंपरी-चिंचवड : 'इझी मनी' ची उच्चभ्रंनाच भुरळ !

शेअर ट्रेडिंग करून जलदगतीने पैसे संख्या झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन दाखल होणाऱ्या अशा तक्रारींचा उंचावणारा आलेख चिंता वाढवणारा आहे. पर्ट टाईम जॉब व अधिकचे उत्पन्न मिळवून देत असल्याचे सांगत विविध प्रकारचे टास्क देत तरुणीची १ कोटी २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

शेअर मार्केट अन् पार्ट टाइम जॉबच्या 'गळा'ला लागून दररोज होते लाखोंची फसवणूक

शेअर ट्रेडिंग करून जलदगतीने पैसे संख्या झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन दाखल होणाऱ्या अशा तक्रारींचा उंचावणारा आलेख चिंता वाढवणारा आहे. पर्ट टाईम जॉब व अधिकचे उत्पन्न मिळवून देत असल्याचे सांगत विविध प्रकारचे टास्क देत तरुणीची १ कोटी २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना ३ वे २६ एप्रिल २०२४ या कालावधीत देहूरोड येथे घडली. या प्रकरणी २६ वर्षीय तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात गुरुवारी (२ मे) फिर्याद दिली आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक केल्याच्या तक्रारी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे आल्या आहेत. मागील सहा महिन्यात यांची संख्या वाढली असून, आमिषाला बळी न पडता फसव्यूक टाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पहिल्या घटनेत एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार व्हीआयपी सर्व्हिस १५ ग्रुप या नावाच्या व्हॉटस अप ग्रुपची अहनिन नरिलेना या संशयित महिलेने अल्फा अक्सिस स्टॉक क्लब या नावाचा अप डाउनलोड करण्यास सांगितला. रथा अपच्या माध्यमातून फिर्यादी महिलेत शेअर खरेदी-विक्री करण्यास सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीची १४ लाख १९ हजार ५९ रुपयांची फसवणूक केली.

दुसऱ्या घटनेत वाकड येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनुराग ठाकूर, कौशल शर्मा या संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी व्यक्तीस संशयितांनी रोअर नार्केटमध्ये जास्त नफा निळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर के. के. आर. सीए स्टडिंग ग्रुप एल-३-व्हीआयपी २२६ या स्टॉक मार्केटिंग कंपनीमध्ये २५ लाख ३० हजार रुपये रक्कम गुंतविण्यास भाग पाडले. त्यातील एक लाख १५ हजार रुपये परत केले. त्यांचे २४ लाख १५ हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केली. स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्यास सोनून डॉक्टरची २९ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच थेरगाव येथे घडला. या प्रकरणी वकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शेअर मर्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची २० लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. पिंपळे सौदागर येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

स्टॉक मार्केट्स आणि ट्रेडिंग कशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी नान्यताप्राप्त ब्रोकर्स, सल्लागार किवा ऑनलाइन स्रोतांद्वारे दिली गेलेली कोणतीही माहिती दोनदा तपासली पाहिजे. उच्च परताव्याची हमी देणाऱ्या योजना या गुंतवणूकदारांना फसविण्यासाठी असतात. सिक्युरिटी अॅड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (एसइबीआय) या भारतीय नोंदणीकृत वेबसाइटवरून शेअर मार्केटबद्दल माहिती मिळते. दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात तक्रारदार तरुणी घरी असताना संशयित आरोपींनी त्यांना ऑनलाईन माध्यमातून संपर्क केला. त्यांना टेलिग्रामवरून पार्ट टाइम काम व अधिकचे उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रिपेड टास्कची माहिती दिली. त्यामधून अधिकचे उत्पन्न मिळेल असे आमिष दाखवून फिर्यादीकडून वेगवेगळ्या बैंक खात्यात १ कोटी २ लाख ८३ हजार ८४८ रुपये जमा करून घेतले. मात्र, त्यानंतर ते पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली.

ऑनलाईन फसवणूक रोखण्याचे आव्हान

शेअर ट्रेडिंगनध्ये गुत्वणूक करण्यासाठी करण मान्यताप्राप्त कंपन्यांसोबत गुंतवणूक केली जते. या कंपन्यांनध्ये एकच बैंक सावे असते. त्याच अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करायचे असतात आणि त्यातून ट्रेडिंग केली जाते. मात्र, जास्त परवाव्याच्या आनिषाला बळी पडून काहीजण सायबर चोरट्याच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पैसे भरतात. फसवणूक झालेल्यांचे मेसे सायकर चोरटे मुढे वेगवेगळ्या बैंक खात्यात वळवून घेत्तत. त्यामुळे ही साखळी शोधण्याचे पोलिसांना आव्हानात्नक ठरते. फसवणूक झाल्याक वकारवार २ ते ३ नहिन्यांनी तक्रार देण्यासाठी येतात, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो

व्हॉट्स अॅप ग्रुपचा वापर

सायबर चोरटे टेलिग्राम, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफार्मवरून गुंतवणूक करण्यावावतच्या पोस्ट शेअर करतात, तसेच व्हॉट्स अपवरून ग्रुप तयार करून त्यामध्ये नवनवीन लोकांना सहभागी करून घेतले जाते. या ग्रुपमध्ये सायबर चोरट्यांचेच आठ ते दहा साथीदार अडमिन असतात. त्यांच्याकडून सातत्याने ग्रुपमध्ये बनावट पोस्ट शेअर केल्या जातात. आज मला खूप नफा झाला, अशा आशयाचा मजकूर सातत्याने ग्रुपमध्ये नमूद केला जातो. त्यामुळे ग्रुपमधील नवीन सदस्यांना गुंतवणुकीसाठी आमिष दाखविले जाते.

ऑनलाईन फसवणूक होणाऱ्यांनध्ये उच्च शिक्षितांच प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर मूहिणी आणि वृद्धदेखील ऑनलाईन ठगांना बळी पडत आहेत. आपण सोशल मीडियावर काय सर्च करीत आहोत आणि त्यानंतर आपल्याला काय मेलेज तसेच फोन येतात याचे भान नेटिझन्सने ठेवणे आवश्यक आहे. फसवणूक झाल्याचे सनजायला उशीर होतो आणि मग त्याच्या तपासालाही विलंब होतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज असून, फसवणूक झाल्याचे समजताच तत्काळ नजीकच्या पोलीस वाण्यात संपर्क करावा - संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा पिंपरी-चिंचवड

आधी बहाणा मग कोटींचा गंडा

■ सोशल मीडियावर एखाद्या ग्रुपमध्ये किंवा पोस्टच्या माध्यमातून ओळख निर्माण केली जाते.

■ शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी शिकवण्याचा बहाणा

■ चांगल्या परताव्याचा बनावट वेबसाइटव्दारे भास.

■ शेअर्स, आयपीओतील गुंतवणुकीने अधिक नफ्याचे आमिष

■ फसवणूक लक्षात येण्यास विलंय

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest