पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा गजाआड; फरासखाना पोलिसांची कारवाई

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला फरासखाना पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्याकडून चोरीच्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंह गील यांनी दिली.

Pune Crime News

पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा गजाआड; फरासखाना पोलिसांची कारवाई

पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला फरासखाना पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्याकडून चोरीच्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंह गील यांनी दिली. (Pune Crime News) 

खंडु दिलीप चौधरी (वय२३, रा. निटुर, ता. निलंगा, जि. लातूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलिसांचे पथक वाहनचोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गस्त घालीत होते. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्हीचे सतत अवलोकन केले जाते. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी चौधरी नेहरू चौकात फिरताना दिसत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने पोलिसांनी नेहरू चौकात धाव घेतली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असतं त्याने रविवार पेठ, नेहरु चौक भाजी मार्केट, मंडई परिसरामधून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेल्या दुचाकी व मोटारसायकल त्याने मुळगावी लातूरला ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी शिरुर आनंतपाळ पोलिसांच्या मदतीने १३ दुचाकी व मोटारसायकल जप्त केल्या. चौधरी हा २०२१ पासून वाहन चोरी करीत असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेले ७ गुन्हे, कोथरुडमधील २ गुन्हे, चतु:शृंगीचा १ गुन्हा, विश्रामबागचे ३ गुन्हे असे एकुण १३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. 

ही कारवाई उपायुक्त संदीपसिंह गील, सहायक आयुक्त रुक्मिणी गलंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक( गुन्हे), अजित जाधव, सहायक पलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अमलदार रिजवान जिनेडी, समिर माळवदकर, राकेश क्षीरसागर, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, सुमित खुट्टे, संदीप कांबळे, मेहबूब मोकाशी, प्रमोद मोहिते, गणेश आटोळे, शशीकांत ननावरे, तुषार खडके, अजित शिंदे यांच्या पथकाने केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest