Pune Crime News : बड्या उद्योजकाच्या घरात सुनेचा छळ, चेन्नईच्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

चेन्नई येथील बड्या कापड व्यावसायिकाच्या घरामध्ये सुनेचा पाच कोटी रुपयांच्या हुंड्यासाठी छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिराने या महिलेचा अंघोळीला गेल्यानंतर विनयभंग केल्याचे देखील फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पीडित महिला देखील पुण्यातल्या मोठ्या उद्योजकाच्या घरातली मुलगी असल्याचे सांगितले जाते.

Pune Crime News : बड्या उद्योजकाच्या घरात सुनेचा छळ, चेन्नईच्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

बड्या उद्योजकाच्या घरात सुनेचा छळ, चेन्नईच्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

पुणे : चेन्नई येथील बड्या कापड व्यावसायिकाच्या घरामध्ये सुनेचा पाच कोटी रुपयांच्या हुंड्यासाठी छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिराने या महिलेचा अंघोळीला गेल्यानंतर विनयभंग केल्याचे देखील फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पीडित महिला देखील पुण्यातल्या मोठ्या उद्योजकाच्या घरातली मुलगी असल्याचे सांगितले जाते. येरवडा पोलिसांनी भादवि कलम ४९८, ३२३, ३५४, ५०६ अन्वये  ३१ वर्षीय पती, सासरे, सासू आणि दीराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २९ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला कल्याणी नगर परिसरामध्ये राहते. हा सर्व प्रकार चेन्नई येथील सावकर पेठ भागात असलेल्या या मुदली स्ट्रीट वरील घरामध्ये घडला.

येरवडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पीडित महिलेच्या सासरच्या व्यक्तींचा चेन्नईमध्ये मोठा कापड व्यवसाय आहे. तर, पीडित महिलेच्या आई-वडिलांचा देखील पुण्यामध्ये मोठा व्यवसाय आहे. ३ डिसेंबर २०१४ रोजी पीडित महिलेचे आणि तिच्या पतीचे लग्न झाले होते. तेव्हापासूनच आरोपींनी या महिलेचा लग्नामध्ये हुंडा जास्त दिला नाही, म्हणून छळ करण्यास सुरुवात केली. माहेरावरून पाच कोटी रुपये घेऊन येण्यासाठी त्यांना वारंवार शिवीगाळ करून मारहाण देखील करण्यात आली. त्या चांगल्या दिसत नाहीत असे टोमणे मारून त्यांना मानसिक त्रास देण्यात आला. त्या बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेलेल्या असताना दिराने बेडरूमच्या काचेतून घाणेरड्या नजरेने त्यांच्याकडे पाहून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पीडित महिलेला ब्रेन स्ट्रोकचा त्रास आहे. त्यांना मुलगा देखील आहे. मागील तीन वर्षापासून कौटुंबिक छळाला कंटाळून त्या मुलाला घेऊन पुण्यामध्ये आई-वडिलांकडे राहतात. मात्र, मागील तीन वर्षांपासून सासरच्या व्यक्तींनी कोणतीही चौकशी अथवा विचारपूस केली नसल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest