पुणे विमानतळावर पुन्हा सोन्याची तस्करी, ३३ लाखाचे सोने जप्त
पुणे विमानतळावर पुन्हा सोन्याची तस्करी करणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कस्टम विभागाकडून या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आरोपीकडून तब्बल ३३ लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. आरोपी २४ कॅरेट सोन्याची तस्करी करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळावर सोन्याची तस्करी करताना अटक करण्यात आलेला आरोपी हा दुबई येथून आला होता. तो अवैधरित्या सोन्याची तस्करी करत होता. आरोपीने कॅप्सूलमध्ये लपवून ३३ लाखांचे आणले होते.
पोलिसांकडून संबंधित आरोपीसह एकाला दोन कॅप्सूलसह अटक करण्यात आली आहे. पोलीस आणि कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी तपास सुरु आहे.