पुणे : ...अन्यथा राजकीय कारकीर्द संपवून टाकेन; भाजपा नेते गणेश बीडकर यांना खंडणीसाठी धमकी

भाजपाचे शहरातील नेते आणि पालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर (Ganesh Bidkar) यांच्याकडे तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. परदेशामधून फोन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली असून खंडणीची रक्कम न दिल्यास राजकीय कारकीर्द संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.

Ganesh Bidkar

संग्रहित छायाचित्र

परदेशातून आला फोन : २५ लाख दिल्यास चित्रफीत व्हायरल करण्यात धमकी

पुणे : भाजपाचे शहरातील नेते आणि पालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर (Ganesh Bidkar) यांच्याकडे तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. परदेशामधून फोन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली असून खंडणीची रक्कम न दिल्यास राजकीय कारकीर्द संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच, सोशल मिडियावर चित्रफीत प्रसारित करू अशी धमकी दिल्याचे गणेश बीडकर यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. 

बीडकर यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. बीडकर हे रविवारी (५ मे) लष्कर भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलेले होते. त्यावेळी त्यांना मोबाईलवर विदेशातून एक फोन आला. फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम न दिल्यास राजकीय कारकीर्द संपविण्याची धमकी दिली. तसेच, समाजमाध्यमात त्यांची चित्रफीत प्रसारित करू असे धमकावण्यात आले. सोमवारी त्यांनी यासंदर्भात गुन्हे शाखेकडे अर्ज दिला. यापूर्वी देखील त्यांना धमक्या आलेल्या आहेत. याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली होती.

ऐन निवडणुकीच्या काळात प्रचारात व्यस्त असलेल्या बीडकर यांना पुन्हा धमकी आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली असून मोबाईल क्रमांक विदेशातील असल्याचे समोर आले आहे. हा फोन विदेशातून करण्यात आला आहे की प्रॉक्सी कॉल किंवा व्हीपीएनद्वारे भारतातून करण्यात आला आहे याचा शोध देखील घेतला जात आहे. त्याकरिता सायबर गुन्हे शाखेची मदत घेतली जाणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest