Pune Crime News : सराईतांकडून चार पिस्तुले जप्त

पुणे : सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police) ठाण्याच्या तपास पथकाने गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीवरून सराईत गुन्हेगारांकडून चार बेकायदा पिस्तूल (pistol) आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

सराईतांकडून चार पिस्तुले जप्त

पुणे : सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police) ठाण्याच्या तपास पथकाने गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीवरून सराईत गुन्हेगारांकडून चार बेकायदा पिस्तूल (pistol) आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime News)

सिद्धेश संतोष पाटील (Siddhesh Santosh Patil) (वय २८, रा. स्वरदीप अपार्टमेंट, वडगाव बुद्रुक, मूळ महाड, रायगड), विकास सुभाष सावंत (वय २६, रा. एसआरए बिल्डींग, वडगाव बुद्रुक, मूळ सावंतवाडी, जिल्हा बीड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस हद्दीमध्ये गस्त घालीत होते.  त्यावेळी पोलीस कर्मचारी देवा चव्हाण आणि सागर शेडगे यांना खबऱ्यामार्फत आरोपी बद्दल माहिती मिळाली. सिद्धेश पाटील आणि त्याचा मित्र विकास सावंत यांच्याकडे गावठी पिस्तुला असून हे दोघेही हिंगणे खुर्द कॅनल रस्त्याच्या बाजूला पाण्याच्या लाईन जवळ बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावला आणि या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना शिताफीने  पकडून त्यांच्याकडून एक लाख ६० हजार रुपयांची चार गावठी पिस्तुले आणि चार हजार रुपये किमतीची आठ जिवंत काडतुसे  जप्त केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest