सराईत वाहन चोरट्याकडून चार दुचाकी जप्त

दिघी पोलिसांनी एका सराईत वाहन चोरट्याला अटक केली आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

सराईत वाहन चोरट्याकडून चार दुचाकी जप्त

चार दुचाकी केल्या जप्त

दिघी पोलिसांनी (Dighi Police) एका सराईत वाहन चोरट्याला अटक केली आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

संतोष जयहिंद गुप्ता (वय 19, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुलीवंदन सणानिमित्त गस्तीवर असलेल्या पोलिसांना एका दुचाकीवरून दोघेजण संशयितपणे जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दिघी आणि चाकण मधून चार दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले.  (Pimpri Chinchwad Crime News)

दोघांकडून दोन लाख 80 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे दिघी पोलीस ठाण्यातील तीन आणि चाकण पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest