हिंजवडी: 'नवऱ्याला वारंवार फोन करू नको' असे समजावण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण

हिंजवडी: माझ्या पतीला वारंवार फोन करू नको, असे समजावण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच महिलेच्या कारची तोडफोड करण्यात आल्याची घटना १७ एप्रिल रोजी दुपारी हिंजवडी फेज तीन येथे घडली.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

हिंजवडी: माझ्या पतीला वारंवार फोन करू नको, असे समजावण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच महिलेच्या कारची तोडफोड करण्यात आल्याची घटना १७ एप्रिल रोजी दुपारी हिंजवडी फेज तीन येथे घडली.

या प्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने एका महिलेच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला फिर्यादी महिलेच्या पतीला वारंवार फोन करून प्रेमाच्या जाळ्यात ओढत असल्याने तिला समजावण्यासाठी फिर्यादी महिला गेली. त्यावेळी आरोपी महिलेने फिर्यादीला शिवीगाळ करून पाण्याच्या स्टीलच्या बाटलीने डोक्यात मारले. मानेच्या मागे चावा घेऊन दुखापत केली. तसेच शरीरावर ठिकठिकाणी नखे मारून ओरखडले. फिर्यादी महिलेचे मंगळसूत्र तोडून तसेच कारची काच फोडून नुकसान केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest