चिखली: तडीपार गुंडाला पिस्तुलासह अटक

चिखली: पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला दोन पिस्तुलांसह अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (२७ एप्रिल) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास साने चौक चिखली येथे करण्यात आली.

संग्रहित छायाचित्र

चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

चिखली: पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला दोन पिस्तुलांसह अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (२७ एप्रिल) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास साने चौक चिखली येथे करण्यात आली. तुषार गौतम झेंडे (वय २६, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी पोलीस अंमलदार सचिन मोरे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार झेंडे हा निगडी आणि पिंपरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी २३ ऑगस्ट २०२२ रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. तसेच त्याने स्वतःकडे बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले. याबाबत गुन्हे शाखा युनिट एकला माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकने तुषार झेंडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे दोन देशी पिस्तूल आणि चार हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest