पुणे: हारको कंपनीत दरोडा टाकणारे गजाआड

पुणे : हडपसर इंडस्ट्रीयल एरियामध्ये असलेल्या ‘हारको ट्रान्सफॉर्म्स’ या कंपनीमध्ये दरोडा टाकणाऱ्या आरोपींना गजाआड करण्यात आले. या चोरट्यांनी कंपनीमधून तांब्याच्या मोठ्या पट्ट्या लंपास केल्या होत्या.

पुणे: हारको कंपनीत दरोडा टाकणारे गजाआड

दोन दिवसांत पोलिसांनी घेतला शोध

पुणे : हडपसर इंडस्ट्रीयल एरियामध्ये असलेल्या ‘हारको ट्रान्सफॉर्म्स’ या कंपनीमध्ये दरोडा टाकणाऱ्या आरोपींना गजाआड करण्यात आले. या चोरट्यांनी कंपनीमधून तांब्याच्या मोठ्या पट्ट्या लंपास केल्या होत्या. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विरोधी पथक २ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. 

अब्दुल कलाम रहेमान साह (वय २४, रा. मोरेवस्ती, चिखली, सध्या रा. नारायणगाव, मुळगाव सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश), प्रेमसागर सुमीरन कनोजिया (वय १९, रा. नेवाळेवस्ती, कुदळवाडी, चिखली, मुळगाव उत्तरप्रदेश), शकील अहमद मन्सुरी (वय २४, रा. म्हाडा बिल्डींग, साकीनाका, मुंबई मुळगाव उत्तरप्रदेश), रिजवान ऊर्फ अहमद रामुल्ला खान (वय १९, रा. साकीनाका, मुंबई, मुळगांव उत्तरप्रदेश), सोमनाथ गणपत कोडीतकर (वय ३८, रा. कात्रज, मुळगाव वेल्हा), अनिल अनंता रेणुसे (वय ३४, रा. आंबेगाव, मुळगाव पाबे, ता. वेल्हा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे कर्मचारी अशोक आटोळे, सहाय्यक पोलीस फौजदार यांना खबऱ्याने आरोपींबाबत माहिती दिली होती. 

हडपसर इंडस्ट्रीयल एरियामधील ‘हारको ट्रान्सफॉर्म्स’ कंपनीमधून दोन वेळा तांब्याच्या पट्या चोरणा-या आरोपींपैकी अब्दुल साह (रा. चिखली, पुणे सध्या रा. नारायणगांव) हा त्याच्या साथीदारांसोबत पुन्हा हडपसर इंडस्ट्रीयल एरिया मधील आणखी एका कंपनीमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या तांब्याच्या दोन पट्या, व गुन्ह्यात वापरलेला एक टेम्पो, एक दुचाकी गाडी, तसेच एक पक्कडवजा कटर, असा एकुण ३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest