Fraud : अगोदर वर्क फ्रॉम होमचे आमिष, नंतर ११ लाख ५१ हजारांची फसवणूक

वर्क फ्रॉम होम करून जास्तीत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ११ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ११ सप्टेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत सांगवी येथे घडली.

Fraud : अगोदर वर्क फ्रॉम होमचे आमिष, नंतर ११ लाख ५१ हजारांची फसवणूक

संग्रहित छायाचित्र

वर्क फ्रॉम होम करून जास्तीत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ११ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ११ सप्टेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत सांगवी येथे घडली.

याप्रकरणी ४४ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांक धारक आणि cutshort HQ  या कंपनीची एच आर महिला महिका (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना वर्क फ्रॉम होम देऊन जास्तीचे पैसे कमावण्याचे आमिष दाखवले. प्रथम गुगल वर काही लोकेशनला लाईक करण्याचे टास्क देत त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर टेलिग्राम ग्रुपवर इतर गुंतवणुकीचे पर्याय सांगून फिर्यादीकडून ११ लाख ५१ हजार ९८४ रुपये घेत त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest