Shailaja Darade : अखेर शैलजा दराडे यांना जामीन मंजूर, ४४ जणांची तब्बल ५ कोटींची केली होती फसवणूक

शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची तब्बल ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना दोन महिन्यांपुर्वी अटक करण्यात आली होती. अखेर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

अखेर शैलजा दराडे यांना जामीन मंजूर

शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची तब्बल ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना दोन महिन्यांपुर्वी अटक करण्यात आली होती. अखेर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी त्यांचा जामीन मंजूर केला आहे. पुराव्यात छेडछाड करू नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये यासह विविध अटीशर्तींसह ७५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.

उमेदवारांना शिक्षक, आरटीओ पदावर, तलाठी पदावर नोकरी लावू तसेच टीईटी पास करून देवू असे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी शैलजा रामचंद्र दराडे (रा.पाषाण) यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर सात ऑगस्टला शैलजा दराडे यांना अटक झाली आहे.

दराडे यांना सुरूवातीला न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी त्यांनी लष्कर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सरकारी वकील अंजली नवगिरे यांनी दराडे यांच्या जामिनास विरोध केला. ऑगस्टमध्ये त्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर दराडे यांनी पुन्हा जामीनासाठी अर्ज केला होता. अखेर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी त्यांचा जामीन मंजूर केला आहे. पुराव्यात छेडछाड करू नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये यासह विविध अटीशर्तींसह ७५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest