Pune : तोतया पोलिसाने ज्येष्ठाला गंडवले, गुन्हा दाखल

पोलीस असल्याची बतावणी करीत मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या जेष्ठ नागरिकाकडील एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. हा प्रकार सोमवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास औंधमधील चोंधे पार्क या ठिकाणी घडला.

Pune : तोतया पोलिसाने ज्येष्ठाला गंडवले, गुन्हा दाखल

तोतया पोलिसाने ज्येष्ठाला गंडवले, गुन्हा दाखल

पुणे : पोलीस असल्याची बतावणी करीत मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या जेष्ठ नागरिकाकडील एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. हा प्रकार सोमवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास औंधमधील चोंधे पार्क या ठिकाणी घडला. चतुशृंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

भिकू कोंडीबा वाईकर (वय ७४, रा. महाअनुराज सोसायटी, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. वाईकर हे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते. मॉर्निंग वॉक करून घरी परत येत असताना दोघेजण दुचाकीवरून त्यांच्या जवळ आले. त्यातील एकाने 'औंध गावामध्ये चोरी झाली आहे. मी क्राईम युनिटचा पोलीस आहे. तुम्ही एवढे दागिने घालून फिरू नका.' असे त्यांना सांगितले. त्यांची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील रुमाल त्याने पुढे केला.

त्यामध्ये दागिने काढून ठेवण्यास सांगितले. त्यानुसार वाईकर यांनी स्वतःची दागिने त्या रुमालात काढून ठेवले. दरम्यान, हात चलाखी करून आरोपीने दुसरा रुमाल त्यांच्यापुढे केला आणि तो त्यांना दिला. त्यांनी घरी जाऊन रुमाल उघडून पाहिला असता, त्यामध्ये दागिने मिळून आले नाहीत. हे चोरटे त्यांच्याकडे एक लाख रुपयांचा ऐवज  घेऊन पसार झाले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest