Crime : पॅराशूूट कंपनीच्या नावाने बनावट तेलविक्री

पिंपरी येथील मेन बाजारात असलेल्या महालक्ष्मी ट्रेडर्स (Mahalaxmi Traders) या दुकानात दुकानदाराने पॅराशूूट कंपनीच्या तेलाच्या नावाने बनावट तेलाची विक्री (Sale of fake oil) केली. याप्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 30) दुपारी करण्यात आली.

Crime

पॅराशूूट कंपनीच्या नावाने बनावट तेलविक्री

दुकानदारावर गुन्हा दाखल

पिंपरी येथील मेन बाजारात असलेल्या महालक्ष्मी ट्रेडर्स (Mahalaxmi Traders) या दुकानात दुकानदाराने पॅराशूूट कंपनीच्या तेलाच्या नावाने बनावट तेलाची विक्री (Sale of fake oil) केली. याप्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 30) दुपारी करण्यात आली.

छीवाराम लादूराम चौधरी (Chhivaram Laduram Chaudhary) (वय 33, रा. चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी निखील दिनकर पाटील (वय 32, रा. कोल्हापूर) यांनी पिंपरी पोलीस (Pimpri Police)  ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी याने त्याच्या दुकानात पॅराशूूट कंपनीच्या नावाने बनावट तेलाची विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दुकानावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 14 हजार 590 रुपये किमतीच्या 238 बनावट तेलाच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest