Fraud : मेडिकल प्रवेशाच्या आमिषाने लाखोंचा गंडा, गुन्हा दाखल

वैद्यकीय शिक्षणासाठी एनआरआय कोट्यामधून ऍडमिशन मिळवून देण्याच्या आमिषाने २७ लाख २६ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. हा सर्व प्रकार डिसेंबर २०२२ ते रविवारपर्यंत घडला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Omkar Gore
  • Mon, 27 Nov 2023
  • 10:55 am
Fraud : मेडिकल प्रवेशाच्या आमिषाने लाखोंचा गंडा, गुन्हा दाखल

मेडिकल प्रवेशाच्या आमिषाने लाखोंचा गंडा, गुन्हा दाखल

पुणे : वैद्यकीय शिक्षणासाठी एनआरआय  कोट्यामधून ऍडमिशन मिळवून देण्याच्या आमिषाने २७ लाख २६ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. हा सर्व प्रकार डिसेंबर २०२२ ते रविवारपर्यंत घडला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयेश शिंदे, पवन सूर्यवंशी (रा. चिखली) आणि राहुल तुपेरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी महेंद्र खंडेराव देशमुख (वय ५९, रा. वसंत कमल विहार सोसायटी, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांच्या मुलीला मेडिकलला ऍडमिशन हवे होते. पवन सूर्यवंशी याने देशमुख यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या मुलीच्या मेडिकलला ऍडमिशन करून देतो असे सांगितले.

त्याने जय शिंदे सोबत त्यांची ओळख करून दिली. शिंदे याने त्यांना एनआरआय कोट्यामधून ऍडमिशन करून देतो असे सांगितले. त्यांच्याकडून वेळोवेळी २७ लाख २६ हजार रुपये ऑनलाईन आणि रोख स्वरूपात घेतले. परंतु, त्यांच्या मुलीचे ऍडमिशन केले नाही. त्यांनी पैसे परत मागितले असता त्यांना पैसे देखील परत करण्यात आलेले नाहीत. अशा प्रकारे त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest