संग्रहित छायाचित्र
पुण्यातील हवेली तालुक्यातील गावडदरा या गावामधील ३५ एकर जमीन खरेदी करून देण्याच्या आमिषाने घेतलेल्या दहा लाख ४५ हजार रुपयांच्या रक्कमेचा अपहार करून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एक ऑगस्ट २०२१ ते २९ मार्च २०२३ या कालावधीत मांगडेवाडी या ठिकाणी घडला.
गौरव संभाजी वीर (वय ३४, रा. क्लासिक विठ्ठल हेरिटेज समोर, आंबेगाव पठार) असे गुन्हा दाखल झालेले असे नाव आहे. याप्रकरणी आबासाहेब भानुदास मांगडे (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. गौरव वीर याने फिर्यादी आबासाहेब मांगडे यांना गावडदरा येथील शिंदे व देशपांडे यांची ३५ एकर जमीन खरेदी करून देतो असे सांगितले होते. या जमिनीच्या विसारापोटी त्यांच्याकडून दहा लाख ४५ हजार रुपये रक्कम वेळोवेळी रोख स्वरूपात घेतली.
त्यांना कोणत्याही प्रकारची विसार पावती करून न दिली नाही. त्यांनी या पैशाची मागणी केली असता थोड्या दिवसात देतो असे सांगून आजवर पैसे परत केलेले नाहीत. त्यांना कोटक महिंद्रा बँकेचा धनादेश दिला. मात्र, हा धनादेश वटला नाही. त्यामुळे मांगडे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.