Pune News : गॅस लीक झाल्याने स्फोट...; कोथरूडमध्ये केली जात होती गॅस चोरी

गॅसच्या मोठ्या टाक्यांमधील स्वयंपाकाचा गॅस छोट्या टाक्यांमध्ये बेकायदेशीरपणे भरला जात असतानाच गॅसचा स्फोट (Gas explosion) होऊन एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कोथरूड (Kothrud) येथील जय भवानीनगरमधील ओम गॅस एजन्सी सेल्स अँड सर्विसेस या दुकानामध्ये घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 25 Oct 2023
  • 12:08 pm
Gas theft

संग्रहित छायाचित्र

पुणे : (Pune) गॅसच्या मोठ्या टाक्यांमधील स्वयंपाकाचा गॅस छोट्या टाक्यांमध्ये बेकायदेशीरपणे भरला जात असतानाच गॅसचा स्फोट (Gas explosion) होऊन एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कोथरूड (Kothrud) येथील जय भवानीनगरमधील ओम गॅस एजन्सी सेल्स अँड सर्विसेस या दुकानामध्ये घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Gas theft)

विष्णुकांत धनाजी चांडेश्वर (वय ४५, रा. काळेवाडी, कोथरूड) आणि आशिष रमेश यादव (वय १९, रा. जय भवानी नगर, कोथरूड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी वैभव कुंडलिक शितकल (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णुकांत चांडेश्वर हा ओम गॅस एजन्सी सेल्स अँड सर्विसेस या दुकानाचा चालक आहे. तर, आशिष यादव हा त्याच्याकडे काम करतो. हे दोघेजण त्यांच्या दुकानामध्ये जीवनावश्यक घरगुती वापराचा स्वयंपाकाचा गॅस हा ज्वालाग्रही असल्याची माहिती असताना देखील त्याच्याशी छेडछाड करीत होते. या स्फोटक पदार्थापासून मानवी जीवितास हानी होईल याची जाणीव असताना देखील केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी या ठिकाणी गॅस चोरीचा धंदा सुरू केला होता. वेगवेगळ्या कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्यांमधून छोट्या रिकाम्या गॅस टाक्यांमध्ये गॅस ट्रान्सफर करण्याचे काम केले जात होते. त्यासाठी एक पाईप वापरला जात होता. हा गॅस भरत असतानाच गॅस गळती झाली आणि मोठा स्फोट झाला. त्यावेळी लागलेल्या आगीमध्ये यादव हा जखमी झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अडागळे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest