संग्रहित छायाचित्र
पुण्यातील बाणेर येथे खळबळजनक घटना घडली आहे. आपल्या बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून दाजीचा खून केला. त्यानतंर मेव्हण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आज (मंगळवारी) बाणेर येथील श्री समृद्धी सोसायटीतील फ्लॅट नं. २०१ मध्ये घडली.
धनंजय साडेकर (वय ३८) असे खून झालेल्या दाजीचे नाव आहे. तर हेमंत काजळे (वय ४०) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मेहुण्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय हे त्यांच्या पत्नीला त्रास देत होते. त्यामुळे आपल्या बहिणीला दाजी धनंजय हे त्रास देत असल्याचा मेव्हण्याच्या डोक्यात राग भरला.
याच रागातून मेव्हणा हेमंत यांनी दाजीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या चतु:श्रृंगी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.