Pune Crime News : “एका एकाचा मुडदा पाडू”, हडपसरमध्ये तरुणाची टोळक्यांनी केली हत्या

पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी डोक्यात धारदार लोखंडी हत्यारांनी वार करून तरुणाची हत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री १० च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी सहा जणांना पोलीसांनी अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 18 Sep 2023
  • 11:39 am
“एका एकाचा मुडदा पाडू”, हडपसरमध्ये तरुणाची टोळक्यांनी केली हत्या

संग्रहित छायाचित्र

सहा जणांना पोलीसांकडून अटक

पुण्यातील हडपसर परिसरात एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी डोक्यात धारदार लोखंडी हत्यारांनी वार करून तरुणाची हत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री १० च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी सहा जणांना पोलीसांनी अटक केली आहे.

स्वप्नील विठ्ठल झोंबर्डे (वय १७, रा. शंकर मठ, मिरेकर वस्ती, हडपसर, पुणे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सनी रावसाहेब कांबळे (वय २५), अमन साजिद शेख (वय २२), आकाश हनुमंत कांबळे (वय २३), जय शंकर येरवळे (वय १६), तौफिक रज्जाक शेख (वय १६) आणि शाहरुख साजिद शेख (वय १७, सर्व रा. मिरेकर वस्ती, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी मृत तरुणाचे वडील विठ्ठल महादेव झोंबार्डे (वय ४६, रा. शंकर मठ, मिरेकर वस्ती, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण स्वप्नील झोंबर्डे याचे आरोपींसोबत पुर्वी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपी सनी कांबळे यांच्यासह इतर साथीदारांनी रविवारी रात्री १० च्या सुमारास हडपसर परिसरात स्वप्नीलला काठले. त्यानंतर धारदार लोखंडी हत्यारांनी स्वप्नीलच्या डोक्यात वार केले. यात हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

तरुणाच्या हत्येनंतर आरोपी सनी कांबळे आणि अमन शेख यांनी त्यांच्याकडील धारदार लोखंडी हत्यारे हवेत फिरवली. आमच्या सोबत कोणी पंगा घेतला, तर असाच एका एकाचा मुडदा पाडू, अशी धमकी देऊन आरोपींनी परिसरात दहशत माजवली. त्यानंतर मृत तरुणाच्या वडीलांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलीसांनी कलम ३०२, ३४ सह आर्म ऍक्ट ४, २५ सह क्रिमिनल लॉ अमे कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest