गेल्या ६ महिन्यात ७ कोटींचे ड्रग्ज जप्त, ८३ जणांना अटक
पुणे पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या ६ महिन्यांमध्ये विविध कारवाईत ७ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणी कारवाई एकूण ५८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पोलीसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एकूण ८३ जणांना अटक केली आहे.
जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये गांजा, कोकेन, मशरूम, मेथ हिरोईन अशा पदार्थांचा समावेश आहे. यात अंदाजे ७७ लाख ८३ हजार रुपये किमतीचा ३८५.५८ किलो गांजा, ३. कोटी ७५ लाख रुपये किमतीचा १.८७४ किलो मेफेड्रोन, ४० लाख ३५ हजार रुपये किमतीचे २०१.३९ ग्रॅम कोकेन, ४ लाख ६८ हजार रुपये किमतीचे ३.२८५ किलो चरस, ७६ हजार रुपयांचे ५ किलो अफूची पावडर, ८ लाख ३४ हजार रुपये किमतीची ४१७ ग्रॅम अफू, ७ लाख किमतीची कॅथा एड्युलिस, १ कोटी १८ लाख रुपये किमतीचे ४२ ग्रॅम एलएसडी, १ लाख ७६ हजार रुपये किमतीचे १८ ग्रॅम एमडीएमए आणि ४० लाख ३३ हजार रुपये किमतीची ३३६ ग्रॅम ब्राऊन शुगर, असा एकूण ७ कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
Ganja 🍀😮💨
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) June 24, 2023
Cocaine 👃🏼😛❄️
MDMA 💊🍬
Mushrooms 🍄
Meth 🧪⚗️
Xanax 🍫
Heroin 💉
𝗣𝗮𝗿𝗲𝗻𝘁𝘀: Emojis 👆 widely used in CHATS by Drug Dealers & Users to refer to various drugs
82 Drug Dealers arrested & Rs. 7.28 cr worth drugs seized in last 6 months.#SayYesToLife #NoToDrugs