ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, ५ कोटींचे ड्रग्ज जप्त
पुणे कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने डॅग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. तब्बल ५ कोटी रुपयांचे एक किलो मेथॅम्फेटामाइन हे ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे.
कस्टम विभागाच्या पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्यावर २९ मे रोजी एका वाहनामधून ८५० ग्रॅम मेथॅम्फेटामाइन ड्रग जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी सखोल तपास करताना पोलीसांनी लोणावळ्याजवळ आणखी २०० ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त केले आहे. या कारवाईमध्ये ड्रग्ज वाहतूक करणारी कार देखील पोलीसांनी जप्त केली आहे. या प्रकरणाचा अधित तपास कस्टम विभागाचे पोलीस करत आहेत.