देहूरोड : बापानेच घेतला चिमुकलीचा भिंतीवर डोके आपटून जीव

पिंपरी चिंचवडमधील चिंचोली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पित्यानेच आपल्या तीन वर्षाच्या मुलीची भिंतीवर डोके ठेचून हत्या केली आहे. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पित्याला देहूरोड पोलीसांनी अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 14 Jun 2023
  • 05:42 pm
Murder : बापानेच घेतला चिमुकलीचा भिंतीवर डोके आपटून जीव

संग्रहित छायाचित्र

आरोपी बापाला देहूरोड पोलीसांनी केली अटक

पिंपरी चिंचवडमधील चिंचोली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पित्यानेच आपल्या तीन वर्षाच्या मुलीची भिंतीवर डोके ठेचून हत्या केली आहे. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पित्याला देहूरोड पोलीसांनी अटक केली आहे.

महादेव नारायण गायकवाड (वय २२, रा. चिंचोली) असे अटक कऱण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार किशोर बबनराव दुतोंडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षाची चिमुकली घरात रडत होती. याच रागातून वडील महादेव यांनी चिमुकलीच्या पोटात लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर उचलून तिचे डोके भिंतीवर आपटले. यात चिमुकलीचा मृत्यू झाला. पोलीसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून त्यांच्यावर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest