Pune Crime News : नराधम पित्याच्या अत्याचारामुळे मुलगी गरोदर; पुण्यातील संतापजनक प्रकार

एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanavadi Police) नराधम पित्या विरोधात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News

नराधम पित्याच्या अत्याचारामुळे मुलगी गरोदर; पुण्यातील संतापजनक प्रकार

पुणे : एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanavadi Police) नराधम पित्या विरोधात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकारे एप्रिल २०२३ ते ऑगस्ट २०२३ या कालावधी दरम्यान घडला. वडिलांच्या अत्याचारामुळे ही मुलगी गरोदर राहिल्याचे समोर आले आहे. (Pune Crime)

पीडित मुलीच्या ३४ वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ५० वर्षीय पित्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी सोळा वर्षांची आहे. तिला पित्याकडून वारंवार हाताने मारहाण करण्यात येत होती. तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने वारंवार तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या संदर्भात मुलीने घाबरून कोणाकडे वाच्यता केलेली नव्हती. मात्र, ती साडेसहा महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest