Crime : अवैध दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

आळंदी पोलीस (Alandi Police) ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध दारू भट्टीवर गुन्हे शाखा युनिट (Crime Branch) तीनच्या पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये अडीच हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे.

Crime

संग्रहित छायाचित्र

आळंदी पोलीस (Alandi Police)  ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध दारू भट्टीवर गुन्हे शाखा युनिट (Crime Branch) तीनच्या पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये अडीच हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी (दि. 3) दुपारी मरकळ येथे करण्यात आली. (Pimpri Chiinchwad Crime)

चरणसिंग प्रभातसिंग रजपूत (Charansingh Prabhatsingh Rajput) (रा. मरकळ, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर जैनक यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रजपूत याने बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन एकत्र करून त्याची भट्टी लावली. याबाबत गुन्हे शाखा युनिट तीनला माहिती मिळाली असता पोलिसांनी रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी एक लाख 25 हजार रुपये किमतीचे 2000 लिटर कच्चे रसायन नष्ट केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest