पुणे : येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

विरोधी गटातील गुन्हेगारांना माहिती पुरवीत असल्याच्या कारणावरून एका कैद्याला मारहाण करण्यात आल्याची घटना येरवडा कारागृहात नुकतीच घडली. याप्रकरणी तीन कैद्यांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News

श्रीकांत राजेंद्र काळे, संजय हरिष भोसले, आकाश मंगेश सासवडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी येरवडा कारागृहातील बॅरक क्रमांक दोनमध्ये कैद आहेत. याप्रकरणी येरवडा कारागृहातील अधिकारी रेवनाथ कानडे यांनी फिर्याद दिली आहे.

येरवडा कारागृहातील सीजे विभागातील बॅरेक क्रमांक एकच्या परिसरात १४ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली होती. कैदी योगेश जगदीश सोनवणे बराकीत बसलेला होता. त्यावेळी आरोपी काळे, भोसले, सासवडे यांनी सोनवणेला बराकीच्या बाहेर बोलावले. विरोधी गुन्हेगारांना माहिती देतो का, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बंदोबस्तावरील रक्षकांनी काळे, भोसले, सासवडे यांना ताब्यात घेतले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest