संग्रहित छायाचित्र
वैद्यकीय महाविद्यालय हस्तांतरित करण्याचे आश्वासन देत फिर्यादीकडून करोडो रुपये रक्कम स्वीकारून खोटे व बनावट एम.ओ.यु. तयार करून फसवणूक केल्याची घटना घ़डली आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संजोग महादेव देशमुख यास पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाचे संदर्भात फिर्यादी परिक्षीत नामपूरकर यांनी तात्काळ त्यांचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांचे मार्फत पोलिसात तक्रार दाखल केली. सदर प्रकरणात तपास अधिकारी श्री विशाल मोहिते यांनी आरोपी संजोग देशमुख यास अटक केली आहे. तसेच, महादेव देशमुख हा मार्च २०२२ पासून अशाच फसवणुकीच्या प्रकरणात ईडी कोठडीत आहे.
अटक आरोपीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांचे न्यायालयात हजर करण्यात आले होते. सदर होण्याचे गांभीर्य लक्षात घेता १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात फिर्यादीकडून वकील विजयसिंह ठोंबरे यांनी कामकाज पाहिले. तर सरकार पक्षाकडून सरकारी वकील रेणुका देशपांडे कर्जतकर यांनी कामकाज पाहिले.