शैलजा दराडे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे (वय ५२, रा. पाषाण) यांना शिक्षण विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवत ४४ जणांची ५ कोटींची फसवणूक प्रकरणी केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता पुण्यातील लष्कर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
उमेदवारांना परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी १४ ते १५ लाख रुपये घेतल्याचा आरोप शैलजा दाराडेंवर आहे. या प्रकरणी अटक करून हडपसर पोलीस ठाण्यत कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना ७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर शैलजा यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पैसे घेतलेल्या उमेदवाराचे व्हॉइस कॉल तपासणे, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांकडून पैसे घेतलेल्याचा देखील आरोपांची चौकशी करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले होते. शैलेजा दराडे यांना हजर केल्यानंतर ५ दिवसाच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांची मागणी मान्य केली नाही. न्यायालयाने शैलजा दराडे यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.