Pune Crime News : वडगाव शेरीत घरफोडी; दोन लाख ७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

वडगाव शेरी येथील मनोहर सोसायटीमध्ये असलेल्या गणेश रेसिडेन्सी मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी (burglary)केली. दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी एकूण दोन लाख ७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तर, आणखी दोन फ्लॅट मध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला.

Pune Crime News

वडगाव शेरीत घरफोडी; दोन लाख ७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

पुणे : वडगाव शेरी येथील मनोहर सोसायटीमध्ये असलेल्या गणेश रेसिडेन्सी मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी (burglary)केली. दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी एकूण दोन लाख ७ हजार रुपयांचा ऐवज लंपास  केला. तर, आणखी दोन फ्लॅट मध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सात नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान घडली. चंदन नगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

प्रसाद विजयकुमार शेळके यांनी फिर्याद दिली आहे. शेळके यांचा वडगाव शेरी येथील गणेश रेसिडेन्सी मध्ये फ्लॅट आहे. या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. शेळके आणि त्यांच्या शेजारच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरामधील दोन लाख सात हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. तर सोमेश कुलकर्णी यांचा तीन नंबरचा फ्लॅट आणि सुरज हगवणे यांचा सात नंबरचा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest