कोथरूडमधून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी, एटीएसची माहिती

दहशतवादी कारवाया करण्यासाठी दोघांनी प्रशिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी घातपात करण्यासाठी काही ठिकाणांची रेकी देखील केल्याचे एटीएसने न्यायालयास सांगितले. त्यामुळे दोन्ही आरोपींवरील दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कलम वाढवण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 26 Jul 2023
  • 12:00 pm
कोथरूडमधून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी

कोथरूडमधून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी

दोन्ही दहशतवाद्यांना ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

पुण्यातील कोथरूडमधून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची धक्कादायक माहिती दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासातून पुढे आली आहे. दहशतवादी कारवाया करण्यासाठी दोघांनी प्रशिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी घातपात करण्यासाठी काही ठिकाणांची रेकी देखील केल्याचे एटीएसने न्यायालयास सांगितले. त्यामुळे दोन्ही आरोपींवरील दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कलम वाढवण्यात आले आहे.

महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. मिठानगर, कोंढवा, मूळ रा. हरमाला कुलकुंडी, रतलाम, मध्यप्रदेश) यांनी दुचाकी चोरीचा प्रयत्न करीत असताना कोथरूड भागातून अटक कऱण्यात आली होती. संशयित दहशतवाद्यांची पोलिस कोठडी संपत असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांच्या न्यायालयाने त्यांना ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दहशतवाद विरोधी पथकाने तपासादरम्यान दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेतली त्यामध्ये विविध वस्तू आढळून आल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पांढरी पावडर सापडली होती. ती पावडर स्फोटके असल्याचे एक्स्प्लोसिव्ह वेफर डिटेक्टरमध्ये स्पष्ट झाले आहे. तसेच पोलिसांच्या डॉग स्कॉडने देखील यासंबंधी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे. ही पावडर नेमके कोणते स्फोटके आहे, त्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest