Photo Morphing : फोटो मॉर्फ करून मैत्रीणीच्या आईचा न्यूड फोटो, न्यूड व्हिडीओसाठी मैत्रीणीला केले ब्लॅकमेल

दहावीच्या विद्यार्थ्यांने मित्राच्या मोबाईलवर बनावट इन्स्ट्राग्राम (fake instagram)अकाऊंट उघडून मैत्रीणीच्या आईचा केवळ चेहरा घेऊन न्यूड फोटो बनविला. हा न्यूड फोटो (Nude photos) व्हायरल करण्याची धमकी (threat) देत मैत्रीणीला तिची न्यूड व्हिडिओ क्लिप (Nude video clips) तयार करून पाठविण्यासाठी ब्लॅकमेल (Blackmail) केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 31 Oct 2023
  • 12:52 pm
Photo Morphing

संग्रहित छायाचित्र

येरवडा :  दहावीच्या विद्यार्थ्यांने मित्राच्या मोबाईलवर बनावट इन्स्ट्राग्राम (fake instagram)अकाऊंट उघडून मैत्रीणीच्या आईचा केवळ चेहरा घेऊन  न्यूड फोटो बनविला. हा न्यूड फोटो (Nude photos) व्हायरल करण्याची धमकी (threat) देत मैत्रीणीला तिची न्यूड व्हिडिओ क्लिप (Nude video clips) तयार करून पाठविण्यासाठी ब्लॅकमेल (Blackmail) केले. या प्रकाराची माहिती पोलिसांनी समजली.  मोबाईलचा मालक असलेल्या मित्राला ताब्यात घेतले. त्याने मित्राला दिल्याचे कबुल केले. मात्र, पोलीसांनी यावर काहीही कारवाई केली नाही.  हे प्रकरण घडून दोन महिने झाले तरी अद्याप संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आले नाही. त्यांमुळे शाळेतील पालक व विद्यार्थीनी भयभीत झाले आहेत. 

शाळेच्या संस्था प्रमुखांनी सांगितले की, ‘‘शाळेतील इयत्ता दहावीच्या वर्गात घटना घडली हे सत्य आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने शाळेकडे तक्रार केली आहे. संबंधित मुलाला शाळेतून काढण्यासाठी प्रक्रिया सुरू होती. मात्र, अनेक प्रभावी व्यक्तींनी दबाव टाकला आहे. त्यामुळे मुलाला शाळेतून काढले नाही. हा प्रकार पोलिसांना माहित आहेत. त्यांनी काही कारवाई केली नसल्याचे आश्चर्य वाटते. ’’

शाळेच्या प्राचार्या म्हणाल्या, पीडित मुलगी आणि हा विद्यार्थी एकाच वर्गात शिकत असल्यामुळे इतर विद्यार्थीनी भयभित आहेत. या प्रकरणात संभ्रम निर्माण झाला आहे.’’

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) सारखी घटना घडत असेल तर तातडीने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. पीडित मुलीला तातडीने समुपदेशन व इतर सहाय्य मिळायला हवे.बाल पोलीस पथक, दामिनी पथक, भोरोसा सेल यांनी तातडीने लक्ष घालण्याची आवश्‍यकता आहे, असे ज्ञानदेवी संस्थेच्या संचालिका अनुराधा सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest