Pune Crime News : रस्त्यावर केक कापण्यावरून नागरिकांना मारहाण; हडपसरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ

मित्राचा वाढदिवस साजरा करीत असताना जोरजोरात फटाके वाजवल्याचा त्रास झाल्यामुळे 'थोडे बाजूला जाऊन फटाके वाजवा' असे सांगितल्याच्या कारणातून टोळक्याने धुमाकूळ घालत ५२ वर्षीय व्यक्तीला मारहाण (beating) करण्यात आली.

Pune Crime News

रस्त्यावर केक कापण्यावरून नागरिकांना मारहाण

पुणे : मित्राचा वाढदिवस साजरा करीत असताना जोरजोरात फटाके वाजवल्याचा त्रास झाल्यामुळे 'थोडे बाजूला जाऊन फटाके वाजवा' असे सांगितल्याच्या कारणातून टोळक्याने धुमाकूळ घालत ५२ वर्षीय व्यक्तीला मारहाण (beating) करण्यात आली. त्यांच्यासह अन्य तीन जणांना देखील दगडाने मारहाण करीत गंभीर दुखापत करण्यात आली. ही घटना हडपसर (Hadpsar) येथील वैदुवाडी येथे घडला. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police)दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक केली आहे. (Pune Crime News)

शाहरुख शेख, (Shah Rukh Sheikh) आवेज फिरोज शेख, (Avez Feroze Sheikh)  गणेश कोंडेलू, (Ganesh Kondalu) सीमा कोंडेलू,(Sima Kondalu) साहिल शेख, (Sahil Shaikh) उमर शेख, (Umar Shaikh) सुभान शेख, (Subham Shaikh) आयान यांच्यासह आणखी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बाळासाहेब सिताराम आवटे (वय ५२, रा. वैदूवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी एकत्र आवटे यांच्या घरासमोर वाढदिवस साजरा करीत होते. त्यांनी या ठिकाणी जोरजोरात फटाके वाजविण्यास सुरुवात केली. आवटे यांनी वाढदिवस कोणाचा आहे? असे विचारणा करीत फटाके थोडे बाजूला वाजवून वाजवा अशी विनंती केली. त्या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी भांडण करीत आवटे व त्यांच्या पत्नी सविता, शेजारी राहणारे अभिषेक सोनवणे, सनी आवटे आणि करीम या सर्वांना शिवीगाळ करून हाताने बेल्ट आणि दगडाने मारहाण करून दुखापत केली.

तर याच प्रकरणात करीम महबूब शेख (रा. ४४) यांनी बाळासाहेब उर्फ नाना आवटे, अभिषेक सोनवणे, सनी आवटे यांच्या विरोधात देखील तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफिक शेख, रहीम, उमर शिवराज कोंडेलू, शेलू हे रोडवर वाढदिवसानिमित्त केक कापत होते. त्यावरून आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घालत शिवीगाळ केली. भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या करीम यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड मारला. एका महिलेचे केस ओढुन मारहाण केली असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest