शेतीच्या व्यवहाराच्या कारणाहून मारहाण

शेतीच्या व्यवहाराच्या कारणाहून तीन जणांनी मिळून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. निगडीतील ओटा स्किम येथे ३१ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. मेघराज भिवाजी साळवे (वय ५५, रा. ओटास्किम, निगडी) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 14 Nov 2024
  • 03:11 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

शेतीच्या व्यवहाराच्या कारणाहून तीन जणांनी मिळून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. निगडीतील ओटा स्किम येथे ३१ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. मेघराज भिवाजी साळवे (वय ५५, रा. ओटास्किम, निगडी) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शिवाजी भिवाजी साळवे, सौरभ शिवाजी साळवे, सुशांत शिवाजी साळवे (सर्व रा. ओटास्किम निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात शेतीच्या व्यवहाराच्या कारणावरून वाद आहे. शेतीच्या व्यवहाराच्या कारणातून आरोपींनी फिर्यादी यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 

आरोपी शिवाजी साळवे यांनी फिर्यादी यांना काठीने मारहाण केली. यात फिर्यादी यांचे उजव्या हाताच्या करंगळी शेजारच्या बोटाचे हाड मोडले. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest