Crime News : एटीएम तोडून चोरीचा प्रयत्न, पोलिसांनी अल्पवयीन मुलासह दोघांना घेतले ताब्यात

एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. रोहित विजय बहादूर सिंग (वय २३रा.महेशगंज, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यत घेतले आहे.

संग्रहित छायाचित्र

एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. रोहित विजय बहादूर सिंग (वय २३रा.महेशगंज, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यत घेतले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२४) रात्री पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये घडली. याप्रकरणी भगवंत ओमप्रकाश मुळे (वय २५ रा. मोशी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे संत तुकाराम नगर येथली एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये स्क्रूड्राव्हरच्या सहाय्याने व लोखडी पट्टीने मशीन खोलण्याचा प्रयत्न करत होते. संशयित हा चोरीचा प्रकार पावनेदोनच्या सुमारास सुरु होता. संशयितांनी एटीएमचे अर्धे शटर ओढून घेतले होते. पोलिसांना या विषयी माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयितांना रंगहात पकडले

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest