Pune Crime News : सराफावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला, दोन पिस्तुलांसह पाच काडतुसे जप्त

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने एका सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे असे तीन लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Pune Crime News : सराफावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला, दोन पिस्तुलांसह पाच काडतुसे जप्त

सराफावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला, दोन पिस्तुलांसह पाच काडतुसे जप्त

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने एका सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे असे तीन लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्हेगारांनी सिंहगड रोड पोलीस ठाणे आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकी केलेली होती असे देखील समोर आले आहे.

राधे मोहन (मुन्ना) सिताराम पिसे (वय १९, रा. प्रेमा कॉलनी, वारजे माळवाडी), समीर ज्ञानेश्वर मारणे (वय २०, रा. मारणे हाइट्स, नऱ्हेमुळगाव मुठा, मुळशी), अर्जुन मोहन बेलदरे (वय २०, रा. गणपती मंदिराच्या पाठीमागे, आंबेगाव बुद्रुक), तुषार दिलीप माने (वय १९, रा. हरणाई कॉम्प्लेक्स, आंबेगाव बुद्रुक), यश मनोज लोहकरे (वय १९, रा. मातोश्री अंगण, आंबेगाव पठार), अनिल दिलीप माने (वय २०, रा. आंबेगाव बुद्रुक), ओंकार उर्फ मयूर दादासाहेब माने (वय २०, रा. गायमुख चौक, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील राधेमोहन आणि समीर हे त्यांच्या एका साथीदारासह मोटरसायकलवरून सराफी पट्ट्यातून फिरताना पोलिसांना निदर्शनास आले.

त्यांना राजे चौकामध्ये ताब्यात घेऊन झडती घेण्यात आले. त्यावेळी या दोघांच्या कमरेला पिस्तुले आढळून आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता राधेमोहन याने त्रिमूर्ती चौकातील सराफावर दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. मागील महिन्यामध्ये त्यांचा टोळी प्रमुख ओंकार लोहकरे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने ही पिस्तूल विकत आणली होती.  या गुन्ह्यामध्ये जामीनाच्या खर्चाची जुळवा जुळवा करण्यासाठी सराफाच्या दुकानात साथीदारांसह दरोडा टाकून तजवीज केली जाणार होती. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, धीरज गुप्ता यांच्या पथकाने केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest