Pune Crime News : पत्नीला ब्लेड गिळायला लावत खुनाचा प्रयत्न

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला कॅल्शियमच्या कॅप्सूलमध्ये ब्लेडचे तुकडे घालून ते गिळायला लावत तिच्या खुनाचा प्रयत्न (attempted murder) करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

Pune Crime News

पत्नीला ब्लेड गिळायला लावत खुनाचा प्रयत्न

पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला कॅल्शियमच्या कॅप्सूलमध्ये ब्लेडचे तुकडे घालून ते गिळायला लावत तिच्या खुनाचा प्रयत्न (attempted murder) करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हा सर्व प्रकार ऑक्टोबर २०२३ ते ८ नोव्हेंबर २०२३ या कालावधी दरम्यान शिवणे येथील समर्थ टेरेस या सोसायटीमध्ये घडला. याप्रकरणी उत्तम नगर पोलिसांनी (Uttamnagar Police) पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार (Domestic violence)आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. (Pune Crime News)

सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५, रा. समर्थ टेरेस, प्रेस्टीज स्कूलच्या शेजारी, शिवणे असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी छाया सोमनाथ सपकाळ (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. सोमनाथ आणि छाया हे पती-पत्नी आहेत. आरोपी सोमनाथ हा त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्या कारणावरून वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण देखील करीत होता. काही महिन्यांपूर्वी सोमनाथचा भाऊ त्यांच्या घरी आला आणि दारू पीत बसलेला होता. त्यावेळी या महिलेने त्याला घरामध्ये दारू पिऊ नका असे सांगितले होते.

त्याचा राग मनात धरून आरोपी सोमनाथने छाया यांच्या कॅल्शियमच्या गोळ्यांमध्ये ब्लेडचे तुकडे टाकले आणि ते गिळायला लावत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गळ्याला काही जखमा झाल्या असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणी खरोखरीच ब्लेडचे तुकडे टाकण्यात आले होते का? याचा उलगडा होईल असे तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest