Pune Crime News : तरुणावर प्राणघातक हल्ला; डोक्यात घातले पालघन अन्...

किरकोळ कारणावरून १८ वर्षीय तरुणाच्या डोक्यात पालघन नावाचा हत्याराने वार करून प्राण घातक हल्ला करण्यात आला. तसेच, त्याला वाचवायला गेलेल्या चुलत भावाला आणि मित्राला देखील बेदम मारहाण करण्यात आली.

Pune Crime News

तरुणावर प्राणघातक हल्ला; डोक्यात घातले पालघन अन्...

पुणे : किरकोळ कारणावरून १८ वर्षीय तरुणाच्या डोक्यात पालघन नावाचा हत्याराने वार करून प्राण घातक हल्ला करण्यात आला. तसेच, त्याला वाचवायला गेलेल्या चुलत भावाला आणि मित्राला देखील बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) तिघा जणांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना अकरा मारुती कोपरा येथे असलेल्या शिवा सर्विसिंग सेंटर जवळ  शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime News) 

वरद कांबळे (वय १८), केतन हातागळेवय (वय १९), प्रथमेश देडगे, वय १८)  अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाने फिर्याद दिली आहे. या घटनेमध्ये श्रीकांत शंकर धनगर (वय १८) हा गंभीर जखमी झाला आहे. फिर्यादी जयेश धनगर आणि त्याचा भाऊ श्रीकांत असे दोन मित्रांसोबत दोन मोटरसायकल वरून शुक्रवार पेठेतील अकरा मारुती कोपरा या ठिकाणी गेले होते. त्यांची मोटरसायकल सर्विसिंग करण्यासाठी हे सर्वजण गेलेले होते.

त्यावेळी त्यांच्या ओळखीचे असलेले वरद, केतन, प्रथमेश त्या ठिकाणी आले. त्यांनी श्रीकांतला शिवीगाळ करीत 'हाच दवे चहा दुकानाजवळ खुन्नस देत होता. याला आज सोडायचं नाही. याचा मर्डर करून टाकू' असे म्हणत हातातील लोखंडी पालघनने त्याच्या डोक्यात वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींनी फिर्यादी जयेश आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ केली. हे दोघेही त्यांना वाचविण्यासाठी गेले असता वरद कांबळेने फिर्यादीच्या हातावर देखील पालघरणे वार केला आणि मित्रांना मारहाण केली. हातातील पालघर हवेत फिरवून परिसरात दहशत माजवीत हे सर्वजण पसार झाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest