Child Marriage : अल्पवयीन मुलीचे लावले लग्न... पती, पत्नी, आईवडील आणि सासू सासऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे लग्न (Marriage of a minor girl)लावल्या प्रकरणी आई वडील सासू-सासरे आणि पती विरोधात चतुशृंगी पोलिस (Chatushringi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Child Marriage

Cअल्पवयीन मुलीचे लावले लग्न... पती, पत्नी, आईवडील आणि सासू सासऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

पुणे : अल्पवयीन मुलीचे लग्न (Marriage of a minor girl)लावल्या प्रकरणी आई वडील सासू-सासरे आणि पती विरोधात चतुशृंगी पोलिस (Chatushringi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने आपली पत्नी अल्पवयीन असल्याचे माहीत (Child Marriage) असताना देखील तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला नऊ महिन्यांची गरोदर केले. (Pune Crime News) 

पती, सासू-सासरे, वडील आणि आई यांच्या विरोधात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा Child Marriage Prevention Act) (अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार हिंजवडी येथील माऊली गार्डन आणि गायकवाड वस्ती, औंध या ठिकाणी घडला. पीडित तरुणी अठरा वर्षांची आहे. ती १७ वर्षांची असताना तिचे लग्न लावण्यात आले. ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आरोपी पतीने तिच्यासोबत लग्न केले.  सासू-सासर्‍यांनी त्याला भरीस घातले. तसेच, आई-वडिलांनी हे लग्न लावून दिले. लग्ना लावल्यानंतर पतीने तिच्याशी हरिक संबंध केल्यामुळे ती गरोदर राहिली. नऊ महिने भरल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. औंध जिल्हा रुग्णालयामध्ये तिची प्रसूती झाली. तिच्या वयाची कागदपत्रे तपासल्यानंतर रुग्णालयाकडून पोलिसांना माहिती कळविण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest