Red light area : येतोस का? शहराबाहेरही फोफावतोय रेड लाईट एरिया

‘चल, लॉज पे जाएंगे’; ‘येतोस का’.. अशा प्रकारच्या संवादाचा वापर करून एकाच दिवशी एक दोन नव्हे तर पाच वेगवेगळ्या पुरूषांचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापाराला खतपाणी घालणाऱ्या आठ महिलांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Red light area : येतोस का? शहराबाहेरही फोफावतोय रेड लाईट एरिया

संग्रहित छायाचित्र

महिलांनी पुरुषांचा सार्वजनिक ठिकाणी विनयभंग केल्याची घटना, पाच जणांनी दाखल केली प्रथमच फिर्याद

चल, लॉज पे जाएंगे’; ‘येतोस का’.. अशा प्रकारच्या संवादाचा वापर करून एकाच दिवशी एक दोन नव्हे तर पाच वेगवेगळ्या पुरूषांचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापाराला खतपाणी घालणाऱ्या आठ महिलांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेड लाईट एरिया म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील बुधवार पेठेत शरीर विक्रीय करणाऱ्या महिला शहरातील रस्त्यावर, महामार्गावर येऊन अशा प्रकारे संवाद साधत पुरूषांना अडविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महिला पोलिसांची गस्त वाढवत कारवाईस सुरूवात केली आहे.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांकडे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभाग आहेत. वरिष्ठ निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि फौजदारासह महिला-पुरुष कर्मचाऱ्यांचा फौजफाटा अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नेमण्यात आला आहे. हॉटेल-लॉजमध्ये जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करायला महिलांना भाग पाडून त्यातून मिळणाऱ्या पैशांवर गुजारण केली अशा शब्दांचा कागदोपत्री वापर करून अनेक पुरूषांवर आत्तापर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच यातील महिलांना पीडित हे नाव देऊन त्यांची सुटका केल्याचे पोलिसांकडून जाहीर केले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नगररोड, कात्रज, चांदणी चौक परिसर, देहूरोड बाह्यवळण रस्त्यावरील रावेत कॉर्नर, दिघी-आळंदी रस्ता, तळेगाव दाभाडे परिसरात महिला रस्त्यावर थांबून येणाऱ्या-जाणाऱ्या पुरूषांना थांबवत त्यांना येतोस का, चल लॉज पे  जाएंगे अशा शब्दात अडवणूक करीत असल्याचे प्रकार उघड होत आहेत.

त्यामुळे गुन्हेशाखेअंतर्गत असलेले सामाजिक सुरक्षा पथक (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग) अशा महिलांवर कारवाई करत आहे. देशात संघटित पद्धतीने कुंटणखाना चालविणे गुन्हा आहे. परंतु, वैयक्तीक पातळीवर हे काम करणे गुन्हा नसल्याने अनेकांनी यातून आपली सुटका करून घेतली आहे. परंतु, रेड लाईट एरिया म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील भागात हा प्रकार गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. मागील काही वर्षांमध्ये पुण्यातील बुधवार पेठेत चालणारा हा व्यवसाय आसपासच्या परिसरात विस्तारल्याचे पहायला मिळते.

पुण्यातील सर्वात मोठ्या भाजी मंडईला लागून हा परिसर असल्याने बुधवार पेठेतील काही महिला भाजी मंडईत थांबून गिऱ्हाईक शोधताना दिसून येतात. त्याच्या पुढे जाऊन आता यातील काही महिला सकाळी रिक्षाने नगर रस्ता, कात्रज, चांदणी चौक, रावेत कॉर्नर, तळेगाव दाभाडे रस्त्यावरील सोमाटणे टोलनाका, दिघी-आळंदी रस्ता येथे येऊन थांबू लागल्या आहेत.

आसपासच्या हॉटेलमध्ये गेल्यावर गिऱ्हाईकाचे ओळखपत्र (आधारकार्ड-पॅनकार्ड) आणि स्वत:चे ओळखपत्र देऊन या महिला उदरनिर्वाह करण्यासाठी शरीर विक्रीय व्यवसाय करू लागल्या आहेत. परंतु, यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या आणि या महिलांकडे न जाणाऱ्या पुरूषांची अडवणूक होऊ लागली आहे.

दिघी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये २१ ते ३९ वर्षीय पाच वेगवेगळ्या पुरूषांनी फिर्याद नोंदविली आहे. यामध्ये तक्रारदार पुरुषांच्या अंगावरून हात फिरवत येतोस का; चल, लॉज पे जाएंगे असे म्हणून अश्लील हावभाव केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्याच बरोबर सार्वजनिक शिष्टाचाराचा सभ्यतेचा भंग होईल या पद्धतीने या महिलांनी कृत्य केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे त्या आठ महिलांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम १९५६ (पिटा) कलम ८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिला या पश्चिम बंगाल, कोलकाता, बिहार, बुलढाणा, वाशीम, पुणे आदी भागातील असून, त्या २४ ते ४० वयोगटातील आहेत.

शहरातील काही ठराविक भागात हे प्रकार आता सर्रासपणे घडू लागले असून, स्थानिक पोलीस आणि गुन्हेशाखेची डोकेदुखी त्यामुळे वाढली आहे. एकीकडे एकाच दिवसात अशा प्रकारचे पाच गुन्हे दाखल झाले असतानाच, आळंदी भागातील दोन लॉज-हॉटेलवर छापा मारून पिंपरी-चिंचवडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने चार महिलांची सुटका देखील केली आहे.

दिघी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये प्रथमच पुरूष तक्रार देण्यासाठी पुढे आल्याचे दिसत असून, अनेकदा पोलिसांनाच सरकार पक्षातर्फे फिर्याद द्यावी लागली आहे. यापूर्वी आळंदी, देहूरोड, रावेत पोलिसांनीदेखील अशा प्रकारे कारवाई केली होती. शरीर विक्रीय व्यवसायात महिलांचे येण्याचे प्रमाण, त्याची कारणे आणि शासनाच्या तोकड्या पुनर्वसन योजनांचा ताळमेळ अद्यापपर्यंत बसलेला नाही. त्यामुळे एकीकडे सामाजिक प्रश्न म्हणून याकडे पाहिले जात असताना, दुसरीकडे आता महिलांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रकार घडू लागले आहेत.

पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांकडून अचानाक छापा मारून, महिलांकडून त्याठिकाणी जबरदस्तीने हा व्यवसाय करवून घेतला जात आहे का याची तपासणी केली जाते. तसेच कोणाला डांबून ठेवले आहे का, तेथे कोणी अल्पवयीन मुली आहेत का याची देखील चाचपणी केली जाते. बेरोजगारी आणि अन्य विविध कारणांनी बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, ओरिसा, झारखंड तसेच महाराष्ट्रातूनदेखील महिला पुण्यात येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे येथील महिला पुणे, पिंपरी-चिंचवडच्या महामार्गावर जाऊन थांबू लागल्याने स्थानिक पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावी लागत आहे.

शहरात नव्याने रेड लाईट एरिया तयार होऊ नये यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हेशाखेच्या विविध पथकांकडून कारवाई सातत्याने केली जात आहे. नागरिकांकडून तक्रार देण्यास प्रथमच पुरूष पुढे आले आहेत. दुसरीकडे वर्षभरात ३०० हून अधिक महिलांची या व्यवसायातून गुन्हेशाखेने सुटका केली आहे.

- सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest