Sexual Harassment at Ruby Hall Clinic : रुबी हॉल क्लिनिकमधील आणखी एक लैंगिक छळाचे प्रकरण

रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic) होत असलेल्या लैंगिक (Sexual Harassment) आणि मानसिक छळाला कंटाळून ४० वर्षीय मिताली आचार्य यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच महिला लैंगिक अत्याचाराचे आणखीन एक प्रकरण समोर आले आहे.

Sexual Harassment at Ruby Hall Clinic

रुबी हॉल क्लिनिकमधील आणखी एक लैंगिक छळाचे प्रकरण

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic) होत असलेल्या लैंगिक (Sexual Harassment) आणि मानसिक छळाला कंटाळून ४० वर्षीय मिताली आचार्य यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच महिला लैंगिक अत्याचाराचे आणखीन एक प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे रुबी हॉल क्लिनिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. एचआर डिपार्टमेंटच्या मॅनेजरने आणि टेक्निशियनने महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केली आणि ती पुरवली नाही तर कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस (Koregaon Park Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

रुबी हॉल हॉस्पिटलचा टेक्निशियन बाळकृष्ण शिंदे (रा. बिबवेवाडी) आणि एचआर मॅनेजर प्रभाकर श्रीवास्तव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ४५ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिलेली आहे. पीडित महिला दापोडी परिसरात राहण्यास आहे. ती रुबी हॉस्पिटलच्या युरो डिपार्टमेंट मध्ये काम करते. २१ एप्रिल २०२३  आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हा सर्व प्रकार घडला.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला युरो डिपार्टमेंट मध्ये काम करीत होती. त्यावेळी शिंदे याने या ठिकाणी तिच्याकडे पाहून अश्लील हातवारे केले आणि तिला डोळा मारला. तिला 'माझ्याशी शरीर संबंध ठेव. नाहीतर मी तुला हॉस्पिटलच्या कामावर टिकू देणार नाही.' असे म्हणत तिचा विनयभंग देखील केला. यासंदर्भात पीडित महिलेने रुग्णालयाच्या प्रशासनाकडे तक्रारी अर्ज केला. या प्रकरणाची चौकशी एचआर विभागाकडून सुरू होती. एचआर मॅनेजर प्रभाकर श्रीवास्तव याने  तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तिला 'तू खोटे बोलत आहेस. तुझ्या डाव्या हातावर आणि अंगावर किती डाग आहेत,हे मला सगळं माहिती आहे.' असे बोलून तिचा देखील विनयभंग केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक इंगोले करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest