संग्रहित छायाचित्र
कॉलेजमध्ये रागाने पाहिल्याच्या खुन्नसमधून पुण्यातील आयटी इंजिनिअरचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. खेड घाटातील जंगलात ६ ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली आहे.
आयटी इंजिनिअर सौरभ नंदलाल पाटील (वय २३, रा. पंढरीनगर,ता. राहता, अहमदनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह ६ ऑगस्ट रोजी खेड घाटातील जंगलात सापडला होता. तो हिंजवडी आयटी पार्कमध्ये खासगी कंपनीत काम करत होता. मित्राने त्याचा चाकूने भोसकून नंतर दगडाने ठेचून खून केल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ याचे मयूर दळवी याच्यासोबत भांडणे झाल्याचे समजले होते. त्यानुसार मयुरला शोध घेऊन कोपरगावमधून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता सौरभ पाटील व मयूर दळवी हे कोपरगाव येथील संजीवनी कॉलेज येथे शिक्षण घेत असल्याचे समोर आले. सौरभने त्याच्याकडे रागाने पाहिल्याच्या कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून मयूरने सौरभ याचा खून केला. दरम्यान, या प्रकरणी शिर्डीच्या माजी नगराध्यक्षांच्या मुलाला देखील ताब्यात घेण्यात आलेल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिचक तपास खेड पोलीस करत आहेत.