Bhosari Crime : कर्मचाऱ्याचा मानसिक छळ करून आत्महत्येस भाग पडले, कंपनीच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल

ओव्हर टाईम करून घेत सतत कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन मानसिक छळ केल्याने एका एम्पलोईने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या ऑपरेशन मॅनेजरवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 17 Oct 2023
  • 02:27 pm
Bhosari Crime : कर्मचाऱ्याचा मानसिक छळ करून आत्महत्येस भाग पडले, कंपनीच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल

कर्मचाऱ्याचा मानसिक छळ करून आत्महत्येस भाग पडले, कंपनीच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल

ओव्हर टाईम करून घेत सतत कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन मानसिक छळ केल्याने एका एम्पलोईने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या ऑपरेशन मॅनेजरवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी भोसरीतील गव्हाणे वस्ती येथे घडली.

सुशील भीमसिंह पाटील (वय २७) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी सुशील याचा भाऊ सागर भीमसिंह पाटील यांनी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (१६ ऑक्टोबर) फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी एस एच जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चाऑपरेशन मॅनेजर नीरज द्विवेदी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील हा एस एच जे इंटर टेक प्रायव्हेट लिमिटेड या मध्य प्रदेश येथील कंपनीत काम करत होता. त्याचे काम हे वर्क फ्रॉम होम होते. यावेळी इंटरनेटचा अडथळा आला किंवा इतर काही अडचणी आल्या तर आरोपी हा फिर्याद सुशील याच्याकडून ओव्हरटाईम करत करून घेत होता. तसेच ओव्हरटाईम नाही केल्यास पूअर रिमार्क दिला जाईल व मी नोकरीवरून काढून टाकेन.  इतर ठिकाणीही तुला काम मिळणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या आरोपी सुशील याला देत होता.

दरम्यान सुशील याच्या कामांमध्ये स्टॅटिक आयपी इश्यू आणि अन्य इशू येऊ लागले. यामुळे सुशीलच्या कामात काही अडचणी आल्या. आरोपीने याप्रकरणी सुशीलला कोणतीही नोटीस न देता सरळ त्याला कामावरून काढून टाकले. याच डिप्रेशन मध्ये जाऊन सुशील याने त्याच्या राहत्या घरी शनिवारी गळफास घेत जीवन संपवले. यावरून भोसरी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा द्विवेदी याच्यावर दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest