Loni Kalbhor : मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानभूमीत अघोरी कृत्यू, जादूटोन्याच्या प्रकाराने सोरतापवाडीत खळबळ

व्यावसायिक वादातून मित्राचा मृत्यू होण्यासाठी सोरतापवाडी (ता. हवेली ) येथील स्मशानभूमीत रात्रीचे वेळी अवैध सावकार असलेल्या एकाने अघोरी पूजा घातली.

मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानभूमीत अघोरी कृत्यू, जादूटोन्याच्या प्रकाराने सोरतापवाडीत खळबळ

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर : पुण्यात जादूटोणा केल्याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. व्यावसायिक वादातून मित्राचा मृत्यू होण्यासाठी सोरतापवाडी (ता. हवेली ) येथील  स्मशानभूमीत रात्रीचे वेळी अवैध सावकार असलेल्या एकाने अघोरी पूजा घातली. त्यामुळे परिसरांत खळबळ उडाली आहे.

अवैध सावकार करत असलेल्या गणेश तात्यासाहेब चौधरी याने गुरूवारी ( ७ डिसेंबर ) रोजी रात्री ही अघोरी पुजा केल्याचे उघडकीस आले आहे. सोरतापवाडीमध्ये राहणारा त्याचा मित्र अमोल मानमोडे याचेशी त्याचा व्यावसायिक वाद झालेने त्याचा मृत्यू होऊन त्यांच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा म्हणून चौधरीने चक्क स्मशानभूमीत ही अघोरी पूजा घातली. एवढेच नव्हे तर त्याच्या कुटुंबाचा नाश व्हावा यासाठी त्याने चक्क मंत्राचे पठण देखील केलेचे उघडकीस आले आहे. सोरतापवाडीच्या स्मशानभूमीमध्ये चौधरी हा रात्री-अपरात्री जाऊन वेगवेगळ्या अघोरी पूजा घालत असल्याची माहिती यानिमित्ताने उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पुरोगामी तसेच सुसंस्कृत शहर अशी ओळख असणा-या पुणे जिल्ह्यात आजही स्मशानभूमीत अघोरी पूजा होत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दोन तृतीयपंथीयांनी पेटत्या चितेसमोर अघोरी पूजा केली होती. तर हडपसरमधील ससाणेनगर परिसरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखून तब्बल १८ लाखांना गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा पुण्याजवळील सोरतापवाडी गावातील स्मशानभूमीत चक्क मित्राच्या मृत्यूसाठी अघोरी पूजा करण्यात आली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

या अघोरी घटनेची माहिती मिळताच पंचक्रोशीतच नागरिकांना धक्का बसला आहे. त्यानंतर चौधरी याच्या विरोधात मानमोडे यांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. वेगवेगळी कारणे सांगून देवॠषी तसेच भोंदूबाबा असले अघोरी प्रकार करण्यास भाग पाडतात. आपल्याला येईल या आशेने लोकही त्यांचे नादाला लागून असे प्रकार करण्यास मागेपुढे पहात नाहीत. शासनाने या अघोरी प्रथांविरोधात कडक कायदे केले आहेत. या कायद्यांना झुगारून कायद्याची भिती न बाळगता, विद्येच्या माहेरघरात असे अघोरी प्रकार सातत्याने उघडकीस येत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest