Intex company : घेतलेल्या मालाचे पैसे ना देता तरुणीने केली इंटेक्स कंपनीची तब्बल दोन कोटींची फसवणूक

तामिळनाडू येथील तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून इंटेक्स कंपनीकडून माल खरेदी केला मात्र त्याचे पैसे न देता तब्बल दोन कोटी रुपयांची एका महिलेने फसवणूक केली आहे.

Intex company : घेतलेल्या मालाचे पैसे ना देता तरुणीने केली इंटेक्स कंपनीची तब्बल दोन कोटींची फसवणूक

संग्रहित छायाचित्र

तामिळनाडू येथील तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून इंटेक्स कंपनीकडून माल खरेदी केला मात्र त्याचे पैसे न देता तब्बल दोन कोटी रुपयांची एका महिलेने फसवणूक केली आहे. याप्रकरणी महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ सप्टेंबर २०२२ ते नोव्हेंबर तिसऱ्या आठवड्याच्या कालावधीत पिंपळे गुरव येथील इंटेक्स कंपनीच्या कार्यालयात हा सगळा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी विलास बद्रिगिरी गिरी (वय ३६, रा. लोहगाव) रविवारी (२६ नोव्हेंबर) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून तामिळनाडू येथील २२ वर्षीय तरुणी, सुगुमार (वय ४४, रा. तामिळनाडू) हरिकृष्णन (रा. तामिळनाडू), टी. कुमारवेल (तमिळनाडू) आदींवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री सत्य साई ट्रेडर्स प्रोप्रायटर फर्म ची मालकीण असणारी तरुणी हिने श्री सत्य साई ट्रेडर्स पार्टनरशीप फर्म इंटरप्रायजेस श्रीराम ट्रेडर्स या विविध फर्म तिच्या व तिच्या नातेवाईकांच्या नावाने स्थापन केल्या व याची कंपनीला कोणतीही माहिती न देता इंटेक्स कंपनीकडून २ कोटी १७ लाख २७ हजार ८८ रुपये रुपयांचा माल खरेदी केला. मात्र त्याचे पैसे न देता कंपनीची फसवणूक केली यावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest