Crime : बांधकाम साईटवरील कामगाराने विकली ६१ हजारांची लोखंडी वायर

बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगाराने साईटवरून ६१ हजारांची लोखंडी वायर चोरून विकली. ही घटना १६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हिंजवडी येथील ब्ल्यूरिच टॉवर येथील बांधकाम साईटवर घडली.

Pimpri Chinchwad News

बांधकाम साईटवरील कामगाराने विकली ६१ हजारांची लोखंडी वायर

बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगाराने साईटवरून ६१ हजारांची लोखंडी वायर चोरून विकली. ही घटना १६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हिंजवडी येथील ब्ल्यूरिच टॉवर येथील बांधकाम साईटवर घडली. (Crime News)

कैलास गंगाधरराव देशमुख (Kailas Gangadharrao Deshmukh)  (वय २९, रा. उंड्री, पुणे) असे आरोपी कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी किरण दत्तात्रय पालखे (वय ३९, रा. स्वारगेट) यांनी हिंजवडी पोलीस (Hinjewadi Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कैलास देशमुख हा ब्ल्युरीच टॉवर द ओरीयन येथे काम करत होता. त्याने बांधकाम साईटवर बांधकामासाठी लागणारी ६१ हजार रुपये किमतीची लोखंडी वायर चोरी करून विकली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest