Murder News : इंद्रायणी नदी घाटावर डोके ठेचून एकाचा खून

देहूगाव येथील इंद्रायणी नदीच्या (Indrayani River) काठावर एका व्यक्तीच्या डोक्यात मारहाण करून खून (Murder) करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 22) पहाटे पाच वाजता उघडकीस आली.

Murder News

संग्रहित छायाचित्र

देहूगाव येथील इंद्रायणी नदीच्या (Indrayani River) काठावर एका व्यक्तीच्या डोक्यात मारहाण करून खून (Murder) करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 22) पहाटे पाच वाजता उघडकीस आली. (Pimpri Chinchwad Crime) 

देविदास मारुती भराडे  (Devidas Maruti Bharade) (वय 42, रा. शिवबा चौक, सुसगाव, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विकास बंडू घुगे (वय 23, रा. महादेव नगर, सुसगाव, पुणे. मूळ रा. मंगरूळ बुद्रुक, परभणी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस (Dehuroad Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 21) रात्री अकरा ते बुधवारी पहाटे सव्वा पाच वाजताच्या कालावधीत अज्ञातांनी फिर्यादी यांचे मामा देविदास भराडे यांच्या डोक्यात मारहाण करून खून केला. हा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest