अल्पवयीन मुलीचा विनयभंग, विरोध करणाऱ्या पत्नीचा जबर मारहाण करत गळ्यावर पाय दाबून खून
पोटाच्या मुलीचा विनयभंग करून विरोध करणाऱ्या पत्नीला दांडक्याने मारहाण करत पायाने गळा आवळून खून केल्याच धक्कादायक प्रकार लोणीकंद परिसरातील आव्हाळवाडी येथे घडली. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून नराधम बापा विरुद्ध लोणीकंद पोलिसांनी खून, विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम बापाने दोन दिवसापूर्वी स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा दारू पिऊन विनयभंग केला. त्यामुळे पीडित मुलीच्या आईचे तिच्या वडीलांसोबत वादविवाद झाले होते. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा आईसमोरच पीडित मुलीचा विनयभंग केला. त्याला तिने विरोध केल्यामुळे आरोपीने तिला लाकडी बांबूने बेदम मारहाण केली.
पहाटे चार वाजेपर्यंत मारहाण करीत तिचे डोके भिंतीवर आपटून तिला जमिनीवर खाली पाडून गळ्यावर पाय दिला. एवढ्यावरच न थांबता घरातील दुचाकी मधील पेट्रोल काढून तुझ्या अंगावर तसेच गुप्तांगावर टाकून तुला जाळून मारतो अशी धमकी देत जबरी मारहाण करीत तिला जीवे ठार मारले. दुर्दैवाने उपचारापूर्वीच सदर महिलेचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.