सदाशिव पेठेत एमपीएससीच्या तरुणीवर कोयत्याने वार, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद
पुण्यात आज दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर एमपीएससी करणाऱ्या तिच्या मित्राने सदाशिव पेठेत कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर ही तरुणी जीव मुठीत धरून धावायला लागली. मात्र, तरुणाने हल्लेखोराला रोखल्याने तरुणीचे प्राण वाचले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सदाशिव पेठेत तरुणीच्या मागे कोयता घेऊन धावणार्या तरूणाला पाहुन कोणीच मदतीला पुढे आले नाही. जखमी अवस्थेत ती मुलगी धावत होती. एवढ्यात लेशपाल जवळगे नावाच्या तरुण त्या मुलीच्या मदतीला धावला. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार एवढ्यात लेशपाल जवळगेने कोयता पकडला आणि हल्लेखोर तरणाला रोखले. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. त्यानंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपी तरुणाने मुलीवर हल्ला करण्यास सुरुवात केली, तेव्हा ती तेथून धावत होती. त्यानंतर एका तरुण तिच्या मदतीसाठी धावून आला. कोयता हातात असलेला तरुण तरुणीच्या डोक्यावर प्रहार करणार एवढ्यात मदतीसाठी धावून आलेल्या तरुणाने कोयता धरला आणि हल्लेखोर तरुणाला रोखले. त्यानंतर इतर लोक मदतीला आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. यानंतर लोकांनी या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले.