Pune Crime News : तोतया लष्करी अधिकाऱ्याने महिलेस साडेतीन लाखांस फसवले

लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करत भाडेतत्त्वावर फ्लॅट घेण्याच्या आमिषाने एका महिलेची ३ लाख ६९ हजार ५२७ रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्या महिलेचे नाव नेहा अंकुश मस्के असे असून त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sun, 8 Oct 2023
  • 01:34 pm
Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

फ्लॅट घेण्याच्या आमिषाने साधला संपर्क, विश्वास संपादन करून वैयक्तिक कारणांसाठी घेतले पैसे

नितीन गांगर्डे

लष्करी अधिकारी असल्याची (fake army officer ) बतावणी करत भाडेतत्त्वावर फ्लॅट घेण्याच्या आमिषाने एका महिलेची  ३ लाख ६९ हजार ५२७ रुपयांची फसवणूक(Fruad) केली आहे. फसवणूक झालेल्या महिलेचे नाव नेहा अंकुश मस्के असे असून त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी नेहा मस्के विश्रांतवाडीत अंकुजा रेसिडेंसी येथे राहतात. त्यांनी आपला फ्लॅट भाड्याने देण्याची ऑनलाईन जाहिरात  दिली होती. ही जाहिरात नो ब्रोकर साईटवर पाहून आरोपीने फिर्यादींशी संपर्क केला. आपण लष्करात अधिकारी असून आता पुण्यात बदली झाल्याने भाड्याने बंगला हवा असल्याचे आरोपीने सांगितले. फिर्यादींनी फ्लॅट असल्याचे सांगितल्यावर आरोपीने फ्लॅटचे फोटो फिर्यादीस व्हॉटस् ॲपवर  पाठवायला सांगितले. नंतर फ्लॅट पसंत असून पैसे तुम्हाला लगेच पाठवतो. त्यासाठी बँकेचे डिटेल्स पाठवण्यास आरोपीने सांगितले. फिर्यादीने डिटेल्स आरोपीला पाठवल्यावर आरोपीने पैसे ट्रान्सफर होत नसल्याचे कारण देत स्वतःच्या खात्यावर १ रुपया पाठवण्यास सांगितले. नंतर आरोपीने फिर्यादींच्या बँक खात्यावर काही रक्कम पाठवली. त्यांच्या गुगल पेवर किरकोळ रक्कम पाठवून विश्वास संपादन केला. याला काही काळ गेल्यावर आरोपीने वैयक्तिक  कारणासाठी पैशांची गरज असल्याचे फिर्यादींना सांगितले. त्यावर फिर्यादींनी वेळोवेळी थोडे थोडे करत ३ लाख ६९ हजार ५२७ रुपये पाठवले. मात्र आरोपी ना फ्लॅट घेण्यासाठी आला, ना त्याने रक्कम परत केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने विश्रांतवाडी पोलिसांत तक्रार दिली. 

याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ढवळे ‘सीविक मिरर’ शी म्हणाले की, फिर्यादी नेहा यांची फसवणूक १४ ते १६ मे २०२३ या कालावधीत झाली आहे. त्यांनी शुक्रवारी पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest